•डी.बी पथकाची कामगिरी.
अजय कंडेवार,वणी :- शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. हे वाढते प्रमाण पाहता, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश कींद्रे व P.I अजित जाधव यांनी पोलीस ठाण्यातील डीबी पथकांना दुचाकीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. दुचाकी चोरांची शोध मोहीम सुरू असता, पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून वणी पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकरणातील 2 मोटरसायकल चोरट्यास अटक केली असून चोरट्यांकडून दोन मोटरसायकल जप्त केल्या आहेत.सतीश उर्फ शेंबडया बाबाराव मडावी (वय 25वर्ष) रा. दादाबादशाह ,ता-राळेगाव जि-यवतमाळ,सौरव घनश्याम भटवलकर (वय 20 वर्ष) रा. सेवानगर,वणी असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. two-wheeler thief “Shembadya” and “Saurav” arrested.Performance of DB team.
पहिली घटना फिर्यादी सुधिर अरूण निखाडे (वय 33 वर्ष) रा. चिखलगाव ता.वणी जि.यवतमाळ यांनी फिर्याद दिली होती त्यांची एक पांढ-या रंगाची होंडा अॅक्टीवा मोपेड कमांक MH-29-AY- 2585 इंजिन नं JF49E81082276 चेचीस नं. ME4JF49 3KF8071803 किंमत अंदाजे 50,000 रू. दि .7. नोव्हेंबर रोजी रात्री 10.वाजता बस स्थानक, वणी येथुन कोनीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली म्हणुन दिलेल्या रिपोर्टवरून पो.स्टे.,वणी येथे कलम 379 भा.दं.वि चा नोंद होऊन तपासावर असतांना सौरव घनश्याम भटवलकर (वय 20 वर्ष) रा. सेवानगर, वणी याचे गुन्हयातील वरील माटार सायकल जप्त करण्यात आली.या गुन्हयात चोरीस गेलेली हिरो होंडा स्प्लेन्डर मोटार सायकल कमांक MH-29 Z-5938 नंबरची चोरी केली असल्याची कबुली दिली.
दुसऱ्या घटनेत यात्रा मैदान दिपक बार समोर सतीष उर्फ शेंबडया बाबाराव मडावी (वय 25 वर्ष),धरा. दादाबादशाह,राळेगाव ता.राळेगाव, जि.यवतमाळ हा ताब्यात होन्डा अॅक्टीवा ग्रे-रंगाची मोटर सायकल घेऊन उभा दिसला त्यास त्याचेजवळ असलेली हॉन्डा मोपेड गाडीचे कागदपत्रे विचारले असता उडवा उडविचे उत्तरे दिले व वाहनाची पाहणी केली असता वाहन हॉन्डा अॅक्टीवा मोपेड ग्रे रंगाची ज्याचे समोरील नंबर प्लेटवर MH-31-DF-1266 व इंजिन क्र. JC44E0579182 चेचीस कमांक ME4JC446CA 8152475 असा असलेली दुचाकी मिळुन आली त्याची अंदाजी किंमत 15 हजार रू. सदरची मोटर सायकल संबंधाने पोलीस स्टेशन लकडगंज जि.नागपुर शहर येथे मोटार सायकल चोरीस गेलेले असल्याचे उघडकीस आले व त्याचा संबंधीत पोलीस स्टेशनालय माहीती दिल्याने तेथील पुढील कायदेशिर कार्यवाही करीता पोलीस स्टेशन लकडगंज, नागपुर ताब्यात देण्यात आले.
या दोन वेगवेगळ्या घटनेत पोलिसांनी दोन आरोपींना गजाआड केले असून आरोपीवर कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सदरची कारवाई वरिष्ठांचा आदेशाने व P.I अजित जाधव यांचा मार्गदर्शनात डीबी प्रमूख API माधव शिंदे,सुदर्शन वानोळे, पंकज उंबरकर,विशाल गेडाम, मो असीम व गजानन कुडमेथे यांनी केली.