अजय कंडेवार,वणी:- दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने शिताफीने ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून १ लाख ७५ हजार रुपयाचा ५ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे. (Twowheeler thief arrested by LCB Crime News )
किरन पेट्रोल पंप पांढरकवडा रोड यवतमाळ परिसरात एक इसम हा त्याचे जवळील होन्डा कंपनीची ड्रिम युगा काळया रंगाची लाल पट्टा असलेली मोटर सायकल क्र- MH-32-AN-1371 ही विक्री करण्याचे उद्देशाने संशयीतरित्या फिरत आहे. किरन पेट्रोल पंप पांढरकवडा रोड यवतमाळ परिसरातील रोडवर माहिती प्रमाणे संशयीत इसम वाहनासह आढळून आल्याने त्यास ताब्यात घेतले त्याचे गणेश पांडुरंग कुडमेथे उर्फ (गणेश भाउराव घोडाम) ३५ रा. इंदीरा आवास घाटी ता. घाटंजी जि. यवतमाळ असे सांगीतल्याने त्याचे ताब्यात असलेल्या वाहनासंबंधाने त्यास विचारपुस केली असता, त्याने मालकी हक्काबाबत कोणतेही कागदपत्रे सादर न करता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पथकास त्याचे ताब्यता असलेली मोटर सायकल ही चोरीची असल्याचा दाट संशय आल्यावरुन पथकाने सदरील मोटर सायकल संबधाने अधिक तपास केला असता ,सदरची मोटर सायकल ही पो.स्टे. मारेगांव जि.यवतमाळ हद्दीतुन चोरी गेली असल्याचे व प्रकरणी अपराध क्रमांक ०८/२०२४ कलम ३७९ भा.द. वि प्रमाणे गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळुन आली. वरुन नमुद संशयीत इसमास ताब्यात घेवुन अधिक विचारपुस केली असता, त्याने नमुद वाहना व्यतिरिक्त इतर मोटर सायकल वेगवेगळ्या ठिकाणावरुन चोरी केल्याची कबुली दिल्याने गणेश पांडुरंग कुडमेथे उर्फ (गणेश भाउराव घोडाम) याचेकडुन भालर परिसर वणी येथुन चार मोटर होन्डा ड्रिम युगा काळा रंग, लाल पट्टा क्रमांक 32-AN-1371,हिरोहोन्डा स्प्लेंडर प्लस काळा रंग, जांभळा पट्टा क्रमांक MH-29-X-9897, स्प्लेंडर आय स्मॉट काळा रंग, लाल पट्टा विना नंबर प्लेटची,हिरोहोन्डा स्प्लेंडर प्रो. काळा रंग, सिल्व्हर पट्टा MH-29-AQ-9951,हिरोहोन्डा पॅशन पनस लाल रंग काळा पपट्टा MH-29-AY-5209 या मोटर सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.गणेश पांडुरंग कुडमेथे उर्फ (गणेश भाउराव घोडाम) वय ३५ वर्षे, रा. इंदीरा आवास घाटी ता. घाटंजी जि. यवतमाळ यास पो.स्टे. मारेगांव अप.क्र. ०८/२०२४ कलम ३७९ गुन्हयात पुढील कार्यवाही कामी पो.स्टे. मारेगांव यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचा आदेशाने PI आधासिंग सोनोने यांचा मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर, सपोनि अमोल मुड़े, पोलीस अंमलदार सुनिल खंडागळे, योगेश डगवार, सुधिर पांडे, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, सतिष फुके सर्व स्थागुशा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.