•वणी पोलिसांची कामगिरी.
अजय कंडेवार,वणी :– वणी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गेल्या 4 महिन्यांपासून पसार असलेला अट्टल घरफोड्या वणी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याच्यावर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक घरफोड्या केल्याचा आरोप आहे. त्याच नाव राजू पुरूषोत्तम पोटे (वय ४७ वर्षे ),रा. नविन लालगुडा,वणी असून तो वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वाघदरा परिसरात लपुन असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली. त्यावरून त्याला तिथे जाऊन अटक करण्यात आली.Attal Burglary “Raju Pote” in custody.
राजु पुरूषोत्तम पोटे (वय ४७ वर्षे ),रा. नविन लालगुडा यावर गुन्हा नोंद झाल्यापासून तब्बल ४ महीने फरार झाला होता. त्याचा शोध घेतला असता मिळुन येत नव्हता.आरोपी राजू पोटे हा अट्टल गुन्हेगार असुन तो वारंवार अपराध करण्याचे सवयीचा असुन अपराध करून फरार होतो व मिळुन येत नाही तसेच वारंवार तो वास्तव्याचे ठिकाण बदलत असल्याने त्याचा शोध घेणेकरीता अथक परिश्रम करावे लागते,अशा फरार आरोपीला पोलीस स्टेशन वणीचे गुन्हे शोध पथकाने शोध घेवून अटक करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही API माधव शिंदे, PSI सुदाम आसोरे, विकास धडसे, शुभम सोनुले, सागर सिडाम, सुनील नलगंटीवार, मोनेश्वर खंडरे यांनी पार पाडली.