• पोलिसांनी केला दफनविधी….
अजय कंडेवार, वणी :- तालुक्यातील पेटूर शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत सापडला असून तो शव मागील 5 ते 6 दिवसाचा असावा असा अंदाज आहे. सदर अनोळखी व्यक्ती पुरुष जातीचा वय अंदाजे 40 ते 45वर्षे वयोगट, उंची अंदाजे पाच फुट, चेहरा गोल घुमट असून काळ्या रंगाच्या केसाची दाढीमिशी आहे. रंग गोरा, बांधा सडपातळ (बॉडी आता फुगलेली असून काळ्या रंगाचे नाईट पॅन्ट व लाल रंगाची टी शर्ट घातलेला होता. काल रात्री 9 वाजता वाजताच्या दरम्यान पेटूर शिवारात पुलाखाली सापडला. परंतू त्या ठिकाणी का व कशासाठी आला ? अनुत्तरीतच आहे..The body of an unknown person was found in a decomposed state., Police performed the burial…
या अनोळखी इसमाच्या शिरपूर पोलिसांनी पंचनामा करुन या कुजलेल्या प्रेताला शवविच्छेदन वणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी मार्फत जागेवरच करण्यात आला. शिरपूर पोलिसांनी दफन विधीही केला हे विशेष…..
” सदर मृतक इसमाचे अद्याप पावेतो ओळख पटली नाही. कारण अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने दफनविधी शिरपूर पोलिसांनी केले. तरीही वरील वर्णनाचे अनोळखी इसम हरविले किंवा घराबाहेर गेले असल्यास किंवा मिसींग तक्रार दाखल असल्यास शिरपूर पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचे आवाहन शिरपूर ठाणेदार गजानन करेवाड यांनी केले आहे.”
गजानन करेवाड (ठाणेदार, शिरपूर पोलीस स्टेशन)
मो. नं:- 9527818484.