• पोलीसगिरी अंगावर बेतली.
•थेट पोलीस पाटील संघटनेची SP कडे तक्रार
स्वप्नील राठोड,दारव्हा:- तालुक्यातील लाडखेड येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या PSI दिक्षीत विरोधात अनेक पोलीस पाटलांकडून उसनवार पैसे घेतले होते .मात्र पैसे परत करण्यास टाळाटाळ करत असल्याने त्रस्त झालेल्या पोलीस पाटलांनी थेट जिल्हा पोलीस कार्यालयात SP डॉ. पवन बनसोड यांच्याकडे तक्रार केली असता यावरून थेट त्या PSI वर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
रितेश दीक्षित असे निलंबन झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे.दीक्षित हे सहा महिन्यापूर्वी लाडखेड पोलीस ठाण्यात रुजू झाले होते. दीक्षित हे रुजू झाल्यापासून अनेकदा वादग्रस्त ठरल्याचे येथील नागरिकांकडून सांगण्यात येते तर यावेळी दीक्षित यांनी पोलीस पाटील सुधाकर डोळे यांच्याकडून एक लाख रुपये, महागाव पोलीस पाटील सुजाता लाड यांचे पती दीपक लाड यांच्याकडून 15 हजार, बोरी अरब पोलीस पाटील हरिदास ठाकरे यांच्याकडून 40 हजार रुपये हात उसने घेतले. असे तक्रारीत सांगितले आहे.
याप्रमाणे इतरही काही व्यक्तींकडून पैसे घेतले, काही दिवसात परत करतो असे सांगून घेतलेले पैसे परत दिले नाही.उपनिरीक्षक दीक्षित यांच्या व्यवहाराची चर्चा होऊ लागली. ठाणेदार स्वप्निल निराळे यांच्याकडे पोलीस पाटील संघटनेने तक्रार करून कारवाईची मागणी केली याबाबत अहवाल ठाणेदारांनी थेट पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांच्याकडे पाठविला यावरून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
“या उपनिरीक्षकाची कामगिरी वादग्रस्त-६-महिन्यापूर्वी लाडखेड पोलीस ठाण्यात रुजू झालेले उपनिरीक्षक हे अनेक कारणावरून वादग्रस्त ठरत असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली आहे. त्यातच पोलीस पाटील संघटनेने दिलेल्या तक्रारीवरून उपनिरीक्षकाचे अखेर निलंबन झाले आहे.”