•15 दिवसात होणार कारवाई……
माणिक कांबळे /मारेगाव :- रोजगार सेवकाना अपमानजनक वागणूक देणाऱ्या आपरेटरच्या विरोधात महाराष्ट्र रोजगार सेवक संघटनेच्या वतीने 5 जून पासून भर उन्हात काम बंद अंदोलनासह धरणे आंदोलनाची सुरुवात करण्यात आली होती. आंदोलनाची दखल घेत नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी पी एम मडावी यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे या आंदोलनाचा समारोप करण्यात आला आहे. मात्र 15दिवसात वागणुकीत सुधारणा न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा महाराष्ट्र ग्राम रोजगार सेवक संघटना तालुका शाखा मारेगावच्या वतीने देण्यात आला आहे.
गावा गावात रोजगार उपलब्ध व्हावा तसेच गावात विकास कामे झपाट्याने व्हावी यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मागेल त्याला गावातच कामे उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार सेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. रोजगार हमीची ऑनलाईन कामे करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर आपरेट करण्यासाठी आपरेटर देण्यात आले असताना गेल्या काही दिवसापासून या योजनेला कंत्राटी पद्धतीचे ग्रहण लागले असून रोजगार सेवकांना डावलून येथील कामकाज आपरेटर कडून होत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने तक्रार अर्जातून करण्यात आला होता. गेल्या अनेक दिवसापासून रोजगार सेवकांनी केलेल्या तक्रारी कडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी 5जून पासून आपरेटरच्या विरोधात काम बंद आंदोलन तथा धरणे आंदोलन सुरु केले होते.
या आंदोलनाची दखल घेत मारेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पी.एम.मडावी यांनी रोजगार सेवकां सोबत चर्चा करत त्याचे समाधान केले. 15 दिवसात आपरेटर च्या कामात सुधारणा करण्याचे लेखी आश्वासना नंतर आंदोलनाचा समारोप करण्यात आला आहे.
रोजगार सेवक हा प्रशासनाचा कान आणि डोळा आहे.त्यांच्यावरील अन्याय कदापि खपवून घेतल्या जाणार नाही. त्यांना विश्वासात न घेता रोजगार हमीची कामे होणार नाही. आपरेटर च्या विरोधातील आंदोलनाची दखल घेऊन त्यांना शोकास देण्यात आली आहे. कामकाजात सुधारणा दिसून आली नाही तर त्याला तात्काळ कामावरून कमी करण्यात येईल
पी.एम.मडावी
गटविकास अधिकारी
(पंचायत समिती मारेगाव)
————————————
बदली हा पर्याय नाही,सुधारणा घडवून आणणे हाच एकमेव पर्याय आहे. सुधारण्याची संधी देऊन अपरेटरच्या वागणुकीत फरक पडला नाही तर प्रशासन हस्तक्षेप करून आशा अपरेटरला थेट कामावरून कमी करण्याची कारवाई करेल.
संजय वानखेडे
(माजी गटविकास अधिकारी प.स मारेगाव)
येत्या 15दिवसात आपरेटर बादल खंडरे यांच्या वागणुकीत सुधारणा झाली नाही,तर अखिल भारतीय सरपंच संघटना रोजगार सेवाकांच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहून आंदोलन तीव्र करेल.
अविनाश लांबट
अध्यक्ष अखिल भारतीय सरपंच संघटना तालुका शाखा मारेगाव————————– रोजगार सेवकांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. रोजगार सेवक हा ग्रामीण भागातील रोजगार बांधवांचा दुवा आहे. त्याच्या वरील अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही.
गौतम दारुडे
अध्यक्ष वंचीत बहुजन आघाडी तालुका शाखा मारेगाव
—————————–
एकदिवसिय आंदोनाचे नेतृत्व:-
महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटनेचे अध्यक्ष खुशाल येरगुडे, सचिव भगवान धाबेकर,यांनी केले. आंदोलन यशस्वीतेसाठी प्रशांत सपाट,गनपत मडावी, संतोष कोंडेकर, अनिल कुमरे, रमेश सिडाम, महादेव गुरुनुले, शौलेश पेंदोर, नारायण सुसराम, विवेक नरवाडे, स्वप्नील ठावरी, गणेश कालेकर, आशिष किनाके, नितेश काटकर, मनोज दडाजे, संदीप जिवणे, वामन डोंगे, आशिष भोयर, गणेश कुळमेथे, सिद्धार्थ खैरे, शेषराव देवाळकर,अमित खीरटकर, गजानन बोधे,प्रमोद जुमनाके, संतोष बल्की, इत्यादीनी अथक परिश्रम घेतले.आभार खैरगांव गट ग्रामपंचातीचे सरपंच चंदू जवादे यांनी मानले.