- दोन्ही युवक ठार ,आता जबाबदार कोण.. प्रशासन, उभा ट्रक की तो काटाघर ?
•निष्पाप जीव कोण भरून देणार.
अजय कंडेवार,वणी :- दुचाकीने कामानिमित्त गेलेले हे दोन्ही तरुण राजूर या आपल्या गावाकडे परत येत असताना अपघातात ठार झालेले युवक श्रीकांत सिनू दोब्बलवार (23) रा. राजूर तसेच अमोल सुरेश कोमलवार रा. गायकवाड फैल, वणी असे तरुणाचे नाव आहे.Finally, ‘Amol’ in ‘that…’ accident died for treatment.Both youths were killed, now who is responsible..The administration, the standing truck or the department store? Who will pay the innocent lives.
मृतक श्रीकांत सिनू दोब्बलवार वय (23 )व अमोल सुरेश कोमलवार वय (22) हे दोघेही काही कामानिमित्त वणी येथे गेले होते. ते आपले काम आटोपून राजूर या आपल्या गावाकडे परत येत असताना हा अपघात झाला. राजूर रिंग रोडवर बेजबाबदारपणे एका काट्यावर काटा करण्यासाठीं उभे असलेले ट्रकांची रांगच रांग ही रांग त्या श्रीकांतचा दृष्टीस न पडल्याने उभ्या ट्रकवर दुचाकी आदळली. दुचाकीची (MH34 DX-7075 ) ट्रकला जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वार श्रीकांत दोब्बलवार हा तरुण जागीच ठार झाला. तर अमोल सुरेश कोमलवार रा.गायकवाड फैल, वणी तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारार्थ चंद्रपूरला हलविण्यात आले होते अखेर त्या तरुणाने उपचारादरम्यान सकाळी 8 वाजता शेवटचा श्वास सोडला.
या दोन्ही युवकांचे शवविश्चेदन ग्रामीण रुग्णालयात येथे सुरू आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.