•आता S.P डॉ. पवन बंसोड घेणार दखल.
अजय कंडेवार,वणी:- शहरातील चायनीज दुकानाला अचानक आग लागल्याची घटना दि.26 सप्टेंबर रोजी मंगळवारी सायंकाळी 6 वाजताचा सुमारास साई मंदिर चौक येथे घडली होती. या परिसरात शेकडोचा उपस्थितीने लोकं होते. मात्र, वाहतूक पोलिस अनुराधा वासाडे हिने मोठ्या हिमतीने त्या दुकानाचा दिशेने धाव घेत वेळीच सावधगिरी बाळगल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
साई मंदिर चौकात वाहतूक पोलीस अंमलदार अनुराधा वासाडे हे कर्तव्यावर असताना त्या चायनीज दुकानातून मोठा धूर येत असल्याचे लक्षात येताच तेथे मोठी गर्दी जमली. काही कळायच्या आत आणखी धूर वाढू लागल्याने त्या दुकानाचा आजुबाजूला आरडाओरडा सुरू झाला.या चायनिजचा दुकानाचा आजूबाजूला 2 बँक, साई मंदिर, हॉटेल,जैताई मंदिर व इतर छोटे मोठे भरपूर दुकाने व मोठी बाजारपेठ असल्याने सदर आग वाढली असती तर आजूबाजूचे परिसरात मोठे नुकसान झाले असते,अश्या परिस्थितीत यावेळी कर्तव्यावर असलेल्या कर्तबगार वाहतूक पोलिस अंमलदार”अनुराधा वासाडे “हिने मोठे धैर्य दाखवित वेळीच समयसूचकता व प्रसंगावधान राखून साई मंदीर चौकातीलच जवळचा एका बँकेत काही कर्मचारी काम करीत असल्याचे लक्षात आलें त्या बँकेत जाऊन तिथे “fire Extinguisher” उपलब्ध होते.ते अग्निशामक यंत्र आणून स्वतः त्या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविले .
या कार्याची वणी शहरात चर्चा सुरू असतानाच “विदर्भ न्युज ने” वृत्त प्रसारित केले असता पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचऱ्यांना कळले याचीच दखल घेत वणी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांनी व वाहतूक शाखा प्रमुख API सिता वाघमारे यांनी वाहतूक अंमलदार अनुराधा वासाडे हिला सन्मान राशी व प्रशस्तीपत्र देत सत्कार करण्यात आला. यावेळी समस्त वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित होते. आता S.P डॉ. पवन बंसोड चा हस्ते सन्मान होणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.