Thursday, May 15, 2025
HomeBreaking Newsअखेर आश्वासनानंतर उपोषण सुटलेच.......!

अखेर आश्वासनानंतर उपोषण सुटलेच…….!

आताही अनेक प्रश्न अनुत्तरिच. का.. कोण आणि फायदा कोणाचा अन् नुकसान कोणाचे?

•डॉ.लोढा यांनाही चौकशी समितीचा अहवाल मान्य होताच मग प्रकरण वाढण्याचे कारण गुलदस्त्यातच?

अजय कंडेवार, वणी :- नवजात अविकसित बाळ प्रकरणी डॉ. महेंद्र लोढा यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी बाळाच्या नातेवाईकांनी दि. 1 सप्टें शुक्रवारपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. जवळपास हे उपोषण सतत 6 दिवस चालले. यात उपोषणकर्त्यांची प्रकृती ही बिघडत होती. या बाबतची माहिती आमदार यांना कळताच या उपोषणकर्त्यांना दि.6 सप्टें. रोजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, यवतमाळ सिव्हील सर्जन राठोड व THO शेंडे यांनी भेट देत उपोषणकर्त्याना आश्वासन दिले की डॉ. लोढा बद्दल चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येइल.उपोषणकर्त्याना ज्यूस (थंड द्रव्य) पाजून त्यांच उपोषण सोडले परंतु न्याय न मिळाल्यास यापुढेही हा लढा सुरूच असेल असेही तेथील उपोषणकर्त्याची आर्त हाक होती.

उपोषण बसताच या घडून आलेला घटनाक्रम खालील प्रमाणे वाचा…….

बाळाच्या व्यंगाला (अविकसित) डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोप पालक व नातेवाइकांनी केला होता. ते बाळ एक महिन्यानंतर गुरुवारी (ता. ३०) दगावल्यामुळे नातेवाईक संतप्त झाले होते. डॉ. लोढा यांच्यामुळेच अविकसित बाळ जन्मास आले व त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे डॉ. लोढा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून वैद्यकीय पदवी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. उपोषणकर्त्यात बाळाचे वडील नरेंद्र शंकर बुजाडे, आजी कौशल्या बुजाडे हे दोघेही उपोषणाला बसले. या उपोषणाची दि 1.सप्टे. रोजी सुरुवात झाली. अवघ्या दुसऱ्याच दिवशी 2.सप्टें ला  एक हाती लागलेली “कथित ऑडिओ क्लिप” बातमीचा माध्यमातुन जनतेपर्यंत खुलासा या स्वरूपात पोहोचविले. त्यानंतर लगेचच त्याच दिवशी डॉ. लोढा यांनी अवघ्या 2 तासातच बाळाचे पालक यांनी खंडणी मागितले असल्याचे काहीं कथित ऑडिओ क्लिप पुरावे म्हणून व त्यांनी लिहिलेली मनोगत पोस्ट एका सोशल मीडियात व्हायरल केली. तिसऱ्या दिवशी 3.सप्टेंबर ला . संपूर्ण उपविभागातही ती कथित ऑडिओ क्लिप वाऱ्यासारखी पसरली. त्याच दिवशी डॉ. लोढा यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत 25 लाख मागणीचा आरोपही पत्रकार परिषदेत केला त्या सर्व पुरव्यासहित डॉ. लोढा ने चौथ्या दिवशी 4.सप्टें ला थेट वणी पोलीस ठाण्यात जाऊन बाळाचे वडील नरेंद्र शंकर बुजाडे व आजी कौशल्या बुजाडे यांचावर खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात यावा याकरिता निवेदन दिले. त्यानंतर पाचव्या दिवशी 5.सप्टे. ला रात्री 9. वाजता रितसर गुन्हा त्या बाळाचा दोन पालकांवर कायदेशीर दाखल करण्यात आला. सहाव्या दिवशी 6.सप्टे. रोजी उपोषणकर्ते यांची शारीरिक परिस्थिती अतिशय बिकट अश्या स्वरुपाची झाली. शेवटी सायंकाळी उशिरा वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, यवतमाळ सिव्हील सर्जन राठोड व वणी THO शेंडे यांनी उपोषण मंडपाला भेट देत उपोषणकर्त्याना आश्वासन दिले की डॉ. लोढा बद्दल चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येइल. या आश्वासनंतर उपोषणकर्ते यांनी अखेर उपोषण सोडलेच…….

सदर प्रकरण 20 दिवसाआधी चौकशी समिती व न्यायप्रविष्ट यांच्या दारात होते .याबाबत डॉ. लोढा यांनी आधीच स्पष्ट सांगितले होते की, जो काही चौकशी समितीच्या निर्णय किंवा निकाल येईल तो मान्य असेल….. परंतु काही दिवसांनीच या प्रकरणात नवजात बाळाचा मृत्यु झाला. त्याचे पोस्टमार्टम त्रिसूत्री डॉक्टर समितीचा मार्फत करण्यात आली. त्यानंतरही त्या नवजात बाळाला डॉ. लोढा यांच्या हॉस्पिटल समोर ठेऊन त्या मृतदेहाची विटंबना देखील झाली. काहींनी या प्रकरणाला “मस्त हवा “दिली. असा आरोपही करण्यात आला.शेवटीं त्या पालकांचे उपोषणही सहा दिवस चालले अखेरचा  क्षनी चौकशी समितीचा अहवालच ठरणार ” मुख्य हिरो “ म्हनायला हरकत नाही. पण या प्रकरणात सर्व काहीं न्यायप्रविष्ट असतानाही काहींनी तर “बहती गंगा मे हाथ धुतले” स्पष्ट या प्रकारात दिसले. पण “तो डायरेक्टर” अद्यापही पडद्यामागेच.. परंतु या प्रकरणातील “मुख्य सूत्रधार “लवकरच समोर येईल यात शंकाच नाही.” व विशेषतः काहींना काही या माहीत नसतानाही नेहमी प्रमाणे घर ओकणेही सूरूच होते.परंतु “त्या” चा ही हेतू नेमका कोणता होता हे अस्पष्टच ? शेवटपर्यंत डॉ. लोढा यांना मानसिक त्रास,नाहक बदनामी सहन करावीच लागली. असे जाणकारांचेही म्हणणे आहे.”

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments